एनएमएमएस परीक्षेत नवघर शाळेचे यश

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

रा.जि.प. नवघर शाळेतील इयत्ता आठवीचे एकूण 13 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षा 24 डिसेंबर रोजी माणगाव येथे संपन्न झाली होती. या परीक्षेत नवघर शाळेतील 13 पैकी 7 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा रायगड जिल्हा परिषदेचे सन्मा. उपशिक्षणाधिकारी सुनिल भोपळे व गटशिक्षणाधिकारी कार्यालय पाली सुधागड यांनी सन्मानपत्र आणि शाळेतर्फे भेटावस्तु देऊन सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी बांगारे यांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी आर्यन चव्हाण, आयुष सुतार, ऋग्वेद कुंभेकर, आर्या वाघमारे, जान्हवी भवार, श्रावस्ती जाधव, आयुष जाधव या सर्वाना पंचायत समिती शिक्षण विभाग पाली सुधागडच्या वतीने अभिनंदन पत्र देऊन अभिनंदन केले.

Exit mobile version