आवास येथे नवरात्रोत्सव उत्साहात

| खारेपाट | वार्ताहर |
आवास येथे सोमेश्‍वर मंदिर येथे नवरात्र उत्सवाची 25व्या वर्षात पदार्पण केले असून त्यानिमित्त कोल्हापूर येथील अंबामातेचे भव्य मूर्ती साकारली असून भव्य देखावा साकारला आहे. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता मोठी व्यासपीठ निर्माण केला आहे. तसेच मंडळींनी कला, क्रीडा ,शैक्षणिक सांस्कृतिक ,आरोग्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. .25 व्या वर्षानिमित्त खेळ पैठणीचा महिलांसाठी विविध होम मिनिस्टर कार्यक्रमात सिने अभिनेते पुष्कर श्रोती व अन्य कलावंतांचा सहभागी होणार आहे.तसेच अष्टमीला सर्व भाविकांसाठी महाप्रसाद देण्यात येईल. अंबा मातेचा भव्य देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी रीघ दर्शनासाठी लागली आहे.

Exit mobile version