श्री जोगेश्वरी माता उत्सव समितीचा निर्णय
। नागोठणे । वार्ताहर ।
येत्या दिवसांतच नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असून हा नवरात्र उत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन करून साजरा करणार असल्याचा एकमुखी निर्णय नागोठण्याची ग्रामदैवता श्री जोगेश्वरी माता उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी घेतला आहे.
यावेळी विश्वस्त समितीचे सचिव भाई टके, उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष विनायक गोळे, सचिव अनिल नागोठणेकर, खजिनदार अनंत मोरवणकर, सहसचिव किरण लाड, विश्वस्त तसेच मंदिराचे पुजारी अशोक गुरव, सदस्य पांडुरंग कोळी, मच्छिंद्र साळुंखे, राजेंद्र राउत, राजेंद्र गुरव, हनुमान बेलोसे, जगदीश चौलकर, संतोष नागोठणेकर, रविंद्र गोलिपकर, दिपक वाडेकर, दिनेश घाग, अशोक भंडारे, संजय राजीवले आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी भाई टके यांनी नवरात्र उत्सवात साजरा करण्यात येणार्या विविध धार्मिक कार्यक्रमांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
नियमांचे पालन करून नवरात्रौत्सव साजरा करणार
