नक्षलवादी आक्रमक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री टार्गेटवर


। गडचिरोली । प्रतिनिधी ।

नक्षली चळवळीवर वारंवार होणार्‍या हल्ल्यांमुळे नक्षलवादी आक्रमक झाले आहे. अलीकडे झालेल्या एटापल्ली तालुक्यातील चकमकीत 12 माओवादी ठार झाले होते. यानंतर तीन आठवड्यांनी शनिवारी माओवाद्यांनी पत्रक जारी केले आहे. जन सुरक्षा विधेयक आणि बारा नक्षलवाद्यांच्या चकमकी वरून माओवादी आक्रमक झाले असून त्यांनी पत्रकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे.

गडचिरोली येथील खनिज संपत्ती वर सरकारचे डोळा असल्याचे सांगत गडचिरोली जिल्ह्यात असलेलं मौल्यवान खनिज उद्योगपतींना मातीमोल दराने देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा माओवाद्यांचा पत्रकातून आरोप आहे. या पत्रकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरही माओवाद्यांनी टीका केली आहे अलीकडे येत असलेल्या जन सुरक्षा विधेयकावरही माओवाद्यांनी टीका केली आहे.

17 जुलै रोजी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी हद्दीत नक्षलवादी आणि -60 जवानांमध्ये चकमक उडाली होती. वांडोली गावाजवळ दोन्ही गट भिडले होते. त्यात तीन मोठ्या माओवादी नेत्यांसह कसनसूर, कोरची, टिपागड, चातगाव दलमचे 12 नक्षलवादी ठार झाले होते. त्यानंतर आता 23 दिवसांनी पश्‍चिम बस सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने शनिवारी पत्रक जारी केले आहे. त्यात त्याने या चकमकीवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यात नक्षलवाद्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सन्मानपूर्वक त्यांच्या नातेवाईकांना देण्याची मागणी केली आहे. अधुरा सपना पुरा करेंगे, आशा आशयाच्या या पत्रातून नक्षलवाद्यांनी पुन्हा आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

Exit mobile version