। मुंबई । वृत्तसंस्था ।
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकार्याने कार्यालयातच आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. लोहारा तालुक्यातील वडगाव येथील कार्यालयात कार्यालयात कुणीही नसताना संबंधित पदाधिकार्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. हणमंत दनाणे असं आत्महत्या करणार्या पदाधिकार्याचं नाव असून ते पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये, गावातील मायादेवी दत्तात्रय गायकवाड, दत्तात्रय कचराप्पा गायकवाड, स्वाती दत्तात्रय गायकवाड यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे नमुद करण्यात आले आहे.या नोटच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.