महाडमध्ये एनडीआरएफ तैनात; 32 जवान दाखल

पूर व दरडग्रस्त भागात तत्काळ प्रतिसादासाठी रमा विहार येथे कॅम्प

| महाड | प्रतिनिधी |

संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर 32 जवानांचे एनडीआरएफ पथक बुधवारी (दि. 1) रात्री उशिरा महाडमध्ये दाखल झाले आहे. मागील काही वर्षांतील पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याच्या घटनांचा विचार करून पावसाळ्यात एनडीआरएफ पथक महाडमध्ये तैनात ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

महाड नगर परिषदेच्या दस्तुरी नाक्यावरील रमा विहार येथे या पथकाचा कॅम्प उभारण्यात आला आहे. या पथकासोबत अद्ययावत बचावसामग्री, चार फायबर होड्या, वायरलेस सेट, श्वान पथक तसेच अन्य अत्यावश्यक उपकरणांचा समावेश आहे. आगामी काळात हे पथक महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूरप्रवण तसेच दरडग्रस्त गावांना भेटी देणार असून नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षिततेबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. नदीकाठच्या आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ एनडीआरएफ पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी यांनी केले आहे.

Exit mobile version