| रायगड | प्रतिनिधी |
संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर 23 जवानांचे एनडीआरएफ पथक सोमवारी रात्री उशिरा महाडमध्ये दाखल झाले आहे. मागील काही वर्षातील आपत्तीचे स्वरूप पाहता पावसाळ्यामध्ये एनडीआरएफचे पथक महाडमध्ये ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
महाड नगरपरिषदेच्या दस्तुती नाक्यावरील रमा विहारमध्ये कॅम्प लावला आहे. या पथकाकडे अद्ययावत उपकरणांसह चार फायबर होडी, वायरलेस सेट, अन्य सामुग्रीचा समावेश आहे. आगामी काळात हे पथक महाड पोलादपूर तालुक्यातील प्राधान्याने दरडग्रस्त, पूरप्रवण गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांमध्ये सुरक्षिततेसंदर्भात जागृती निर्माण करण्याचे काम करणार आहे.