| नेरळ | वार्ताहर |
मध्य रेल्वेवरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी स्काय वॉक उभारला जात आहे. फलाट एक येथील पादचारी पूल येथून जाणारे प्रवासी हे थेट मध्य रेल्वे पार्किंगमध्ये जाणार आहेत. या स्काय वॉकचे पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून या महिन्यात स्काय वॉक प्रवासी यांच्यासाठी खुला होणार आहे.
मध्य रेल्वे वरील मुंबई-पुणे मेन लाईनवरील नेरळ जंक्शन रेल्वे प्रवासी यांच्यासाठी स्काय वॉक उभारला जात आहे. या स्थानकात लोकलने मुंबई येथून येणारे प्रवासी हे थेट स्थानकाच्या बाहेर पडू शकणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना या नवीन स्काय वॉकचा फायदा होणार आहे. या स्काय वॉकवर सध्या छप्पर टाकण्याचे काम सुरु आहे. आजूबाजूला काचा लावण्याचे काम तसेच किरकोळ कामे सुरु आहेत.