केरळमधील स्थिती चिंताजनक ; तात्काळ उपचार घेण्याच्या सूचना
। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
केरळमध्ये गेले अनेक दिवस कोरोनाचा कहर सुरू असतानाच केरळवर आणखी एक संकट आले आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत केरळमधील स्थिती चिंताजनक असून केरळच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उपचार घेण्याच्या सूचना केली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यांमध्ये केरळमध्ये जवळपास 300 पेक्षा अधिक मुलांमध्ये मल्टी-सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम-इन चिल्ड्रन म्हणजेच पोस्ट कोविड कॉम्पलीकेशन आढळून आले आहेत. यातील चार मुलांचा मृत्यू झाला असून एमआयएस-सी मुळे केरळच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पोस्ट कोविड कॉम्पलीकेशनची लक्षणं काय
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमणातून बरे झाल्यानंतर लहान मुलांमध्ये तीन ते चार आठवड्यांनी ताप, पोटात दुखणे, डोळे लाल होणे आणि मळमळ अशा काही समस्या जाणवू शकतात. त्यातही एमआयएस-सी लागण 15 वर्ष वयापेक्षा कमी मुलांना झाली आहे. आतापर्यंत 300 पेक्षा अधिल मुलांमध्ये याची लक्षणं आढळून आली आहेत.
आई-वडिलांना आपल्या मुलामध्ये एमआयएस-सी चे लक्षणं आढळून आल्यास तत्काळ उपचार घ्यावा. यावर उपचार शक्य आहेत. पण याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.
पिनाराई विजयन, मुख्यमंत्री केरळ