निकिता भोईर यांचा शेकापमध्ये प्रवेश

। उरण । प्रतिनिधी ।

उरण विधानसभा शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवून भाजपच्या माजी सभापती निकिता भोईर, नित्यानंद भोईर, रत्नमाला म्हात्रे, प्रकाश कडू, गोविंद सुतार, मुकेश थळी, प्रणित ठाकूर, राहुल पाटील यांनी प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला खिंडार पडले आहे. तसेच, आम आदमी पार्टीच्या कार्यकत्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने आम आदमी पार्टी उरण विभाग अध्यक्ष विवेक पयेर यांच्यासह पदाधिकारीव कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे, एल.बी.पाटील, तालुका चिटणीस विकास नाईक, गायक सम्राट आनंद शिंदे, वामन तांडेल, रवी घरत, रमाकांत पाटील, जासई सरपंच संतोष घरत, शहर चिटणीस शेखर पाटील, रमाकांत म्हात्रे, सचिन ताडफळे, नित्यानंद भोईर, सिताराम नाखवा आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version