। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर-माकडडोरा कातकरीवाडी येथील नागरिकांनी शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. तसेच, चिरनेर-केल्याचा माल आणि चांदायली कातकरीवाडी येथील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनीदेखील शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. वावेघर ग्रामपंचायतीचे भाजपचे माजी सदस्य रमेश माळी आणि वावेघर ग्रामपंचायतीच्या शिवसेनेच्या विद्यमान सदस्या शारु रमेश चव्हाण यांनी प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.