। उरण । प्रतिनिधी ।
उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मोटरसायकल प्रचार फेरी आणि जाहीर सभांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले आहे.
प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.15) दुपारी 4 ते 6 वाजताच्या दरम्यान मोटरसायकल प्रचार फेरी आणि सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत उरण नगरपरिषदेच्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.16) उलवे नोड येथे दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत मोटरसायकल प्रचार फेरी आणि सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत उलवे नोड सेक्टर 5 येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.17) करंजाडे येथे दुपारी 2 ते 4 मोटरसायकल प्रचार फेरी आणि सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत सेक्टर 4 येथे जाहीर सभा होणार आहे. याचदिवशी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत मोहोपाडा येथे मोटरसायकल प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. तर सायंकाळी 7 ते 10 वाजता मोहीपाडा येथील अचानक क्रिकेट क्लबच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या मोटरसायकल प्रचार फेरी आणि जाहीर सभांना कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.