। उरण । प्रतिनिधी ।
आमच्या भुमीपुत्रांची तरुण मुले शिकलेली आहेत. मात्र, त्यांच्याकडे आवश्यक प्रशिक्षण नसल्याने या तरूणांना पात्रता असूनही नोकरी मिळत नाही. यामुळे हा तरूण निराश झाला आहे. या तरूणांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळविण्यासाठी सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे. येथील बेरोजगाराची समस्या दूर करण्यासाठी आता ‘गरज तिथे नोकरी’ हेच धोरण अवलंबण्याचा निर्धार आपण केला असल्याचे प्रतिपादन प्रीतम म्हात्रे यांनी केले आहे. उरण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शेकाप उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी दिघोडे येथे मतदारांच्या गाठभेठी घेऊन दौरा केला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी सरपंच किर्तीनिधी ठाकूर, बंडाशेठ, जितेंद्र म्हात्रे, महेश साळुंखे, शिवाजी काळे आदी उपस्थित होते.