नितीन देसाई प्रकरण! 13 ऑक्टोबरला सुनावणी

| मुंबई | प्रतिनिधी |
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी ईसीएल व्यवस्थापनाच्या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे रद्द करा, अशी याचिका ईसीएलचे अध्यक्ष रशेश शाह, मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार बन्सल आणि जितेंद्र कोठारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.

शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 13 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. गणपती विसर्जनामुळे खालापूर पोसीस ठाण्यातील तपास अधिकारी न्यायालयात उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यामुळे सरकारी वकिलांनी यासंदर्भात वेळ मागवून घेतला आहे. नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कोणताही अंतरिम दिलासा किंवा अटकेपासून संरक्षण न देता ही सुनावणी आता 13 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Exit mobile version