एनएमएमटीच्या बसला आग

| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसला गुरुवारी सकाळी खोणी-तळोजा रस्त्यावरील नागझरी बसथांब्याजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना वेळीच सावध केल्याने जीवितहानी टळली. मात्र, बस आगीत पूर्णपणे जळूनखाक झाली आहे. ही शार्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला.

नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बस कल्याण-डोंबिवली दिशेने येत होती. खोणी-तळोजा रस्त्यावर असताना नागझरी गावाजवळील बसथांब्याजवळ बसमधून धूर येऊ लागला. चालकाने तात्काळ बस थांबून प्रवाशांना खाली उतरवले. प्रवासी बसमधून उतरताच बसने पेट घेतला. या परिसरात कंपन्या, गोदामे असल्याने काही वेळ या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. बसला आगल्याच्या काही क्षणातच बस भस्मसात झाली. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ आग विझवली. आगीत बसची आसन व्यवस्था, यंत्रसामुग्री जळून खाक झाली, अशी माहिती परिवहन विभागातील अधिकार्‍याने दिली.

Exit mobile version