नागोठणे परिसर मोतीबिंदू मुक्त करणार

| नागोठणे । वार्ताहर ।

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे मॅन्युफॅक्चरींग डीव्हिजन, सी.एस.आर. विभाग व लायन्स हेल्थ फाउंडेशन, चोंढी-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 23) सकाळी 10 ते दुपारी दोन या दरम्यान नागोठणे परिसरातील ग्रामपंचायत कुहिरे व ग्रामपंचायत वरवठणे हद्दीतील वय वर्षे 45 च्या पुढील नागरीकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नागोठणे जवळील वरवठणे येथील आयोजित नेत्र तपासणी शिबिरात धनावडे बोलत होते.

प्रज्ञा जवके, उदय जवके, राजन जगताप, ऋतुजा म्हात्रे, गणपत म्हात्रे,श्रीकांत गोडबोले यांच्या हस्ते शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, सी एस आर विभागाच्या प्रमुख वरदा कुळकर्णी, शुभदा कुडतलकर, डॉ. प्रशांत बारडोलइ, किरण सातवे, दयानंद ठाकूर, प्रमोद कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिबिरात एकूण 71 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एकूण 26 मोतीबिंदू रुग्ण आढळले.

Exit mobile version