। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील आंबेळी येथे होणारे डम्पिंग ग्राऊंड रद्द करण्यात यावे, या मागणीचे निवेदन संघर्ष समितीतर्फे आ. भरत गोगावले यांना देण्यात आले.
तळा शहरातील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेले डम्पिंग ग्राऊंड आंबेळी येथे नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेत स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या राणेची वाडी, आंबेळी बौद्धवाडी व आंबेळी आदिवासीवाडी या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी या डम्पिंग ग्राऊंडला विरोध दर्शविला आहे. याबाबत तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढून आंबेळी येथे होत असलेले डम्पिंग ग्राऊंड हटविण्याची मागणी केली होती. त्यानंतरही डम्पिंग ग्राऊंडचे काम हे सुरू राहिल्याने डम्पिंगला विरोध करण्यासाठी तिन्ही गावातील ग्रामस्थांनी संघर्ष समितीची स्थापन केली. या संघर्ष समितीमार्फत आ. भरत गोगावले यांना आंबेळी येथे होत असलेले डम्पिंग रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी आ. भरत गोगावले यांनी डम्पिंग ग्राऊंड हटविण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे संघर्ष समितीकडून सांगण्यात आले.
आंबेळी येथे होणारे डम्पिंग रद्द करण्याचे निवेदन
