। पनवेल । वार्ताहर ।
मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात मेरा रेशन नावाचे मोबाईल ऍप लाँच केले आहे. ज्यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबीतील लोकांना फेअर प्राईज शॉप सोबत रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती आणि रेशन कार्ड धारकांना मिळणार्या सुविधा बाबत सर्व माहिती मिळू शकणार आहे. मेरा रेशन ऍप हे अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोरवरून युजर्स हे डाऊनलोड करू शकतात. सध्याच्या घडीला कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाईलवर सरकारी योजना आणि मिळणारा लाभ याची पूर्ण माहिती मिळू शकते. मात्र अर्ज ऑनलाईन ऍपची प्रभावी अंमलबजावणी होणे देखील तितकेच गरजेचे आहे.