आता माझ्याच शिवसेनेचा व्हीप लागू होणार- उद्धव ठाकरे

। मुंबई । प्रतिनिधी।

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज दिलेला निर्णय हा सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडनागडं राजकारण उघड पाडणारा आहे, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत मला समाधान वाटते. हा निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याच्या नव्हता, तर लोकशाही जिवंत ठेवण्याच्यादृष्टीने आवश्यक होता. राजीनामा देणं कायदेशीरीत्या चूक असेल पण माझी लढाई ही जनतेसाठी आहे. आता देशाला वाचवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने यानिमित्ताने सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं राजकारण उघडं पाडलं. आता माझ्याच शिवसेनेचा व्हीप लागू होणार आहे. निवडणूक आयोग म्हणजे काही ब्रम्हदेव नाही.

उद्धव ठाकरे


राज्यपाल यंत्रणा आतापर्यंत आदराची होती. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात राज्यपाल महोदयांची भूमिका संशयास्पद आणि अयोग्य असल्याचे म्हटले. या निकालामुळे राज्यपालांचं वस्त्रहरण झाले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर ती यंत्रणा जिवंत ठेवायची की नाही, हे दिसून आले आहे.

नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यायला हवा. आता शिंदेंनी मला नैतिकता शिकवू नये. माझ्याप्रमाणे शिंदे फडणवीस यांनीही राजीनाम द्यावा. अपात्रतेचा विषय जरी अध्यक्षांकडे सोपवला असेल तर त्यांनी लवकारत लवकर तो निर्णय घ्यावा. असे उद्धव ठाकरे गुरुवारी (दि.11) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Exit mobile version