आता वृद्धांना मिळणार पेन्शन

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी सरकारने वृद्धांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. दिल्ली सरकार 80 हजार वृद्धांसाठी नवीन वृद्धापकाळ पेन्शन सुरू करणार आहे. त्यामुळे दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही महत्त्वाची घोषणा आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पेन्शनची घोषणा केली आहे. आमच्या सरकारमध्ये 1.25 लाख नागरिकांनी या पेन्शन फायदा झाला आहे. तर आता या संख्येत वाढ होऊन एकूण 5 लाख 30 हजार वृद्धांना ही पेन्शन मिळणार आहे. दरम्यान, या योजनेची घोषणा केल्यापासून गेल्या 24 तासांत दहा हजार अर्ज आले आहेत. आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेलो तेथे मला लोक वृद्धांसाठी पेन्शन योजनेची मागणी करायचे. आता त्याचीच अंमलबजावणी दिल्ली सरकारने केली आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. त्यानुसार 60 ते 69 वयोगटातील व्यक्तीला दरमहा दोन हजार रुपये दिले जातील. तर, 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तीला दरमहा अडीच हजार रुपये दिले जातील.

Exit mobile version