| चिरनेर | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या ओमकार विजय वाणी यांना रसायनशास्त्र या विषयातील मानाची व प्रतिष्ठेची समजली जाणारी ही पदवी दि. 1 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली असून, त्यांना ती समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. ओमकार विजय वाणी हा चिरनेर गावातील एक हुशार विद्यार्थी असून, त्याचा पनवेल कॉलेजमधील विद्यार्थी प्रवास 2013-14 या शैक्षणिक वर्षी सुरू झाला. शैक्षणिक वर्ष 2015-16 ला त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर एम.एस.सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री) या विषयात त्याने आपले शिक्षण 2017-18 या वर्षी पूर्ण केले.
पुढे जाऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा दिली. ही परीक्षा पास होऊन दिनांक 11 जुलै 2019 रोजी याच महाविद्यालयातील रिसर्च सेंटरमध्ये प्रोफेसर डॉ. अनिल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी या पदवीसाठी त्यांनी प्रवेश घेतला. पीएचडी करताना त्याला महाविद्यालयातील सर्व स्टाफचे मार्गदर्शन लाभले. विशेष करून प्रा. डॉ. गणेश ठाकूर यांचे मोठे सहकार्य व पाठिंबा लाभला. ओमकार वाणी याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.






