चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; खोपोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

। खोपोली । वार्ताहर ।
पोलीस हद्दीतील राज इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल दुकानात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शटरचे कुलूप तोडून पाच मोबाईल चोरून दोन इसम पसार झाले होते. सदर चोरीची घटना 19 जुलै ची होती आणि 6 ऑगस्ट रोजी पर्यंत तपास सुरू असताना तपास कार्याला यश आले आणि आरोपींना खोपोली पोलीसानी ताब्यात घेतले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक राकेश कदम व डीबी टीम यांना तपास करण्यासाठी आदेशित केले.

सदर घटनेच्या अनुषंगाने घटना घडलेल्या रात्रीच्या वेळेतील रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील बाहेर जाणाऱ्या रस्त्यालगतील कॅमेरे तसेच त्यावेळेस शहरात आलेली संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली आणि माहिती घेण्यास सुरुवात केली त्यादरम्यान घरपोडी करणाऱ्या दोन इसमांची अस्पष्ट छायाचित्रे समोर आली.

त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधार व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या पर्याप्त माहितीवरून घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांचा शोध घेण्यात खोपोली पोलिसांना यश आले. सदर गुन्ह्यातीलदोन आरोपींपैकी एक आरोपीत हा मर्डरच्या गुन्ह्यात बारा वर्षे शिक्षा भोगलेला असून दुसरा आरोपीत हा मर्डरच्या गुन्ह्यात तब्बल 20 वर्ष शिक्षा भोगून 2021 मध्ये बाहेर आलेला आहे.अशा आरोपीताना अतिशय कौशल्य पूर्ण योग्य पद्धतीने ताब्यात घेण्यात टीमला यश आले आहे
या टीम मध्ये.

सहायक पोलिस निरीक्षक राकेश कदम, पोलिस हवालदार प्रसाद पाटील, पोलिस शिपाई प्रदीप खरात, रामा मासाळ, दत्ता नुलके नुलके, स्वागत तांबे यांचा सहभाग होता. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राकेश कदम हे करीत आहेत.

Exit mobile version