तलावात बुडून एकाचा मृत्यू

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील मांजुरणे गावातील एका 38 वर्षीय इसमाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.27) घडली. दिलीप जनार्दन रणपिसे (वय38) हा दि.26 जुलै रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गावातून फेरफटका मारुन येतो, असे त्याच्या नातेवाईकांना सांगुन गेला होता. 27 जुलै रोजी त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो गावाच्या परिसरातील तलावात बुडलेल्या स्थितीत मिळुन आला. त्यास उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास खिरीट करीत आहेत.

Exit mobile version