झाडावरुन पडल्याने एकाचा मृत्यू

| पोलादपूर | वार्ताहर |

झाडाच्या फांद्या तोडताना खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पोलादपूर तालुक्यातील देवळे येथे घडली. नारायण रावजी माचुत्रे (56) असे मृताचे नाव आहे.

लहुळसे येथील नारायण माचुत्रे हे शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घरातून जंगलभागातील झाड तोडण्यासाठी गेले होते. दुपारी जेवायला घरी परत ते आले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला असता ते झाडाखाली पडल्याचे दिसले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याबाबत पोलादपूर पोलिस ठाण्यामध्ये त्यांचा मुलगा उत्तम नारायण माचुत्रै याने फिर्याद दिली. माचुत्रे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये करण्यात आले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version