मोहोपाडा तलावात बुडून एकाचा मृत्यू

। रसायनी । प्रतिनिधी ।
मोहोपाडा येथील सार्वजनिक तलावात गेल्या काही वर्षांत बूडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.पानशील येथील राम बापू काठावले (वय 58) हे मोहोपाडा येथून नेहमीप्रमाणे चालत जात असताना तलावाजवळ आले असता त्यांचा पाय घसरला व त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. त्यांना काही दिवसांपासून अंधूक दिसत होते.

मोहोपाडा तलावास काठ नसल्याने पाय घसरून पाण्यात बुडून मयत झाल्याची फिर्याद देविदास दामोदर काठावले यांनी रसायनी पोलिस ठाण्यात दिली आहे. राम बापू काठावले यांच्यावर चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

याप्रकरणी घटनास्थळी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version