| रसायनी | वार्ताहर |
गुळसुंदे येथे पाताळगंगा नदीत उडी मारून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली असून, रसायनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विष्णू सुरेश फसाले यांनी रसायनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. शंकर सुरेश फसाले (23), व्यवसाय-मोलमजुरी, रा. शिंदेवाडी-मोहोपाडा याने दारूच्या नशेत पाताळगंगा नदीमध्ये उडी मारली असल्याने व तो बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला असून, त्यास औषधोपचाराकरिता ग्रामीण रूग्णालय चौक येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई माळी व तपासिक सहाय्यक फौजदार एल.जी. कोळेकर अधिक तपास करीत आहेत.