तीन अपघातात एक ठार; दोन जखमी

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघात एक ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. पनवेल जवळील गव्हाण फाट्याजवळ पप्पूसिंह राजपूत (वय 24) हा त्याची अ‍ॅक्टिव्हा स्कुटी घेऊन जात असताना त्याच्या गाडीला पाठीमागून आलेल्या डंपरने धडक दिली. या अपघातात तो जखमी होऊन मयत झाला. तर दुसर्‍या अपघातात नवीन पनवेल येथून पायी जात असलेल्या 64 वर्षीय एका महिलेला पाण्याच्या टँकरची धडक बसल्याने त्यात त्या जखमी झाल्या. तर तिसर्‍या घटनेत कळंबोली सेक्टर 1 इ येथे राहणारे पोपट काटकर यांना मोटार सायकलींची धडक बसल्याने ते जखमी झाले. या अपघाताची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version