एक लाखाची रोख लंपास

| पनवेल | वार्ताहर |

बँकेतून काढलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन घरी निघालेल्या तरुणाच्या हातातील पिशवी भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना कळंबोलीत घडली. पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली सेक्टर-2 मधील एल आय जी वसाहतीत राहणारा ओंकार प्रभाकर चव्हाण (24) याचा रस विक्रीचा व्यवसाय आहे. बँकेतून एक लाख रुपये काढून पायी घरी जात असताना, कळंबोली सेक्टर-3 ई मध्ये मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्या हातातील लाख रुपयांची पिशवी हिसकावून पलायन केले. या घटनेनंतर ओंकारने कळंबोली पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version