रोह्यात आणखी एका तरुणीचा गळफास, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील वरसे येथील एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

रोहा तालुक्यात वर्षभरात सातआठ तरुणांनी जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यात काहींनी कौटुंबिक नैराश्यातून जीवन संपविले. तर काही तरुणांनी फ्रेंडशिप करोगे सोशल मीडियाच्या मायाजाळ दुनियेला घाबरून आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून बोलले गेले.

अधिक तपास संबंधीत यंत्रणा करीत आहे, तरुणांची आत्महत्या घटना ताजी असतानाच वरसेतील बबीता छोटेलाल शर्मा वय २० हिने कोणत्यातरी अज्ञात कारणाने राहते घरात छताला ओढणी बांधून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडल्याचे समोर आले. घरात कोणीही नव्हते, अशात गळफास घेतलेल्या बबीताला बेशुद्ध अवस्थेत पाहून नातेवाईकांनी उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या अकस्मित घटनेने शर्मा कुटुंबावर अक्षरशः दुःखाचे डोंगर कोसळले. तरुणी बबीता शर्मा हिने आत्महत्या पर्याय का निवडला याचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तत्वतः बबीता शर्मा हिच्या मृत्यूची अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली.

Exit mobile version