कलमार गाडीची धडक बसल्याने एका व्यक्तीचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल तालुक्यातील सोमटणे कोन-सावळा रोड येथील नवकार कार्पोरेशन लि. या ठिकाणी कलमार गाडीवरील चालक गाडी मागे घेत असताना त्या गाडीखाली अज्ञात व्यक्ती सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कलमार गाडी चालक काशिलिंग अर्जून (47) हा त्याच्या ताब्यातील गाडी हयगयीने, निष्काळजीपणे व बेदरकारपणे पाठीमागे घेऊन मयत व्यक्ती राजेंद्र जाधव (54) यास धडक देऊन त्यास गंभीररित्या जखमी केल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version