। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर येथील आयटीआय संस्थेतील शिल्प कारागीर योजनेअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी दहावीच्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रवेश निश्चित करण्यात येणार असून प्रवेश घेणार्या इच्छुक उमेदवारांनी आपला प्रवेश ऑनलाईन पध्दतीने शासनाच्या https.admission.dvet.gov.in या वेबसाईटवर नोंदवायचा आहे असे आवाहन प्राचार्यांकडून करण्यात आले आहे.
प्रशिक्षण संस्थेत एक ते दोन वर्ष कालावधीचे एकूण 91 व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले असून त्यापैकी खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वेल्डर, डिझेल मकॅनिकल, ड्रेस मेकींग हे अभ्यासक्रम एक वर्ष तर यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स, फिटर, इलेक्ट्रिशियन या दोन वर्ष मुदतीच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. प्रवेशासंबधीचे नियम, आवश्यक दस्ताऐवजांची माहीती, प्रवेश कार्यपद्धती याबाबत विस्तृत माहीती समाविष्ट असलेली माहितीपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षणाचा जास्तीतजास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खालापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी.के. सोनावणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी एच. ए. करंबेळकर, : 9423876243 ,. चौधरी सर भ्रमणध्वनी : 86938669919 येथे संपर्क साधावा.