। अलिबाग । वार्ताहर ।
सध्या जागतिक पातळीवर भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा ठसा उमटविण्याचे महत्वपूर्ण काम बौद्ध स्थापत्य व कलेने केले आहे. असे असले तरी ज्या भूमीत या सांस्कृतिक ठेव्याची जडण-घडण झाली त्या देशातील जनता या ऐतिहासिक वैभवापासून अनभिज्ञ असल्याचे लक्षात येते. भारताचा इतिहास हा एका वेगळ्या अर्थाने बौद्ध प्रभावाचा समांतर इतिहास आहे. हा प्रभाव येथील अर्थशास्त्रापासून ते कलेपर्यंत संस्कृतीच्या सर्व अंगावर पाहता येतो.
गेल्या काही वर्षांमध्ये या सार्याचा रितसर अभ्यास सुरु झाला असून त्या विषयाला बौद्ध अभ्यास असे म्हटले जाते. म्हणूनच इन्साईटस् इंडिया या संस्थेकडून आपला समृद्ध असा इतिहास जाणून घेण्यासाठी बौद्ध कला, लेणीशास्त्र, बौद्ध तत्वज्ञान, 21 वे शतक व बौद्ध संबंध यांचा एकत्रित समावेश असलेला नवा कोरा तीन महिन्यांचा प्राथमिक प्रमाणपत्र ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाचे मूल्य 3500/- व माध्यम मराठी असून दर रविवारी सायंकाळी 5.30 वाजता या अभ्यासक्रमाचे वर्ग होणार आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी कोणतीही शैक्षणिक अर्हतेची अट नाही. विषयाचा अभ्यास करण्याची आवड हा एकमेव पात्रता निकष आहे. या अभ्यासक्रमाच्या नोंदणीस सुरुवात झाली असून जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी 9967934562 या क्रमांकावर संपर्क साधावा.




