माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शेठ साबळे पुण्यस्मरणदिनी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन

| खोपोली | प्रतिनिधी( संतोषी म्हात्रे ) |
खोपोली शहराचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शेठ साबळे यांच्या 21 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त, खोपोलीत महारक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र चिकित्सा तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे कर्करोग पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन 27 फेब्रुवारी रोजी एल एम साबळे नगर महाराजा मंगल कार्यालय येथे 10 ते 3 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे, रक्तदात्यास मोफत पेन ड्राईव्ह देण्यात येणार आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या शिबिरार्थीनी येताना आधारकार्ड रेशनकार्ड ची प्रत आणावी, मधुमेह व रक्तदाब औषधे सुरू असतील तर आणावी त्याचप्रमाणे शिबिरात रुग्ण आढळल्यास त्यास शस्त्रक्रियेसाठी जाण्याची राहण्याची व जेवणाची मोफत सोय शंकर हॉस्पिटल पनवेल यांचे मार्फत करण्यात येणार आहे असे आयोजक साबळे परिवार व मित्रपरिवार याच तर्फे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे याकरिता संपर्क साधावा शैलेश विठलानी9370263361, सुहास वझरकर. 8830772347. लक्ष्मण कुलकर्णी 9637821407.

Exit mobile version