सैन्यभरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

| खांब | वार्ताहर |

रायगडचा युवक फाऊंडेशनच्या युवक अकॅडमीतर्फे भारतीय सैन्य भूदल, हवाई दल, नेव्ही व केंद्र सरकारच्या गृहखात्याची सुरक्षा दलात रायगड जिल्हा सैनिक कार्यालयाच्या व श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट रोहा सहयोगाने सैन्यभरती मार्गदर्शन मेळाव्याचे मोफत आयोजन (दि.6) दुपारी दोन वाजता करण्यात आले आहे.

यासाठी भारतीय सैन्यात 10वी पास मुली व तिन्ही दलात 10वी, 12वी, पदवीधर, परिचारिका मुले, मुली, आय.टी.आय. डिप्लोमा, इंजिनिअर आणि बँड पथकातील साहित्य वाजविणारे, शिपाई, सफाई कामगार, आठवी पास, एसएससी नापास, हिंदू, मुस्लिम, पारशी धर्माचे शिक्षण देणाऱ्या मुलांना या माहितीचे शिबीर श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट रोहा, दिवाणी न्यायलयाच्या बाजुला रोहा-रायगड येथे देण्यात येणार आहे. या शिबिरात भरतीयोग्य इच्छुक मुले-मुली यांना पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच, इच्छुकांनी दुपारी 2 वाजेपर्यंत आपल्या मुळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर, या मेळाव्यासाठी आपल्या नाव नोंदणीसाठी गणेश भगत, रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान, अध्यक्ष 9699207314/88794 34166 व व्हिआरटीआय 7276251217 येथे करावी. तसेच अधिक माहितीसाठी 9270446777 येथे संपर्क साधावा, असे आवाहन रायगडचा युवक फाऊंडेशनचे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ, रायगड भूषण प्राध्यापक जयपाल पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version