सिकलसेल सप्ताहाचे आयोजन

| आगरदांडा । प्रतिनिधी।

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मार्फत डॉ. विकासनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र आगरदांडा अंतर्गत आरोग्यवर्धनी केंद्र राजपुरी येथे सिकलसेल सप्ताह आयोजित करण्यात आले होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सौरभ घरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विकासनी चव्हाण, डॉ. धनसे मॅडम, शालिकराव पावरा, आरोग्य सहाय्यिक चव्हाण, बळी अशावर्कर तसेच मदतनिस सहभागी होते.

तालुका सिकलसेल सहाय्यक-शालीकराव पावरा मार्गदर्शन केले. त्यानी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा स्वच्छता या बाबत माहिती दिली. हे शिबिर तालुक्यातील शिघ्रे,कोर्लई,पारगान,चेहर -शिरगाव आदिसह प्राथमिक आरोग्य केंद्रात व लसीकरण केद्रात 17 डिसेंबर पर्यत असणार आहे असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version