पनवेलमध्ये विविध योजनांच्या आयोजन

| नवीन पनवेल । वार्ताहर ।

पनवेलच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आजही शासकीय विविध योजना माहिती नाहीत त्या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाचे विलास फडके आणि ग्रुप ग्रामपंचायत चिपळे यांच्या वतीने या विविध योजनांचे आयोजन केले होते. नागरिकांना यावेळी ई श्रम, हेल्थ आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्डसह सर्व अपडेट समस्यांचे निवारण करण्यात आले. तसेच नवीन मतदान नोंदणी करण्यात आली.

घरकाम करणार्‍या महिलांसाठी योजनांची माहिती देऊन त्यांचे निरसन करण्यात आले. निराधार आणि विधवा महिला पेन्शन योजना सुरू करण्यात आली. हनुमान मंदिर हॉल, विहिघर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नामदेव फडके, माजी सरपंच कांता फडके, सरपंच हिंदोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version