क्षात्रैक्य माळी समाजातर्फे क्रिकेट लीगचे आयोजन


| अलिबाग | वार्ताहर |

रायगडमध्ये अलिबागच्या लहान लहान गावांत तसेच, राज्यभर विखुरलेला क्षात्रैक्य माळी समाज एकत्र येऊन समाजातील मुलांचे क्रिकेटमधील कला गुण कौशल्य दिसावे. या हेतूने या चषकाचे आयोजन शुक्रवारी (दि.22) कुरुळ आझाद मैदान येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये 16 संघांनी सहभाग घेतला असून लीग स्वरूपामध्ये ह्या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परीषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषदे माजी सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषदे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, सावता माळी बँक चेअरमन रमेश नाईक, विजय कवळे, शंकर गुरव, श्रीकांत कवळे, भूपेंद्र पाटिल, जयंत नाईक, जगदीश कवळे, मनोज राऊळ, श्रीनाथ कवळे, विजय म्हात्रे, सदिच्छा पाटील, अवधूत पाटिल, निलेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version