। उरण । वार्ताहर ।
वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने 92 वा ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रह, हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिन, जंगल सत्याग्रह झाला त्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम रविवारी (दि.25) दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत चिरनेर अक्कादेवी माळरान येथे साजरा होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वनवासी कल्याण आश्रम प्रांत अधिकारी ठमाबाई पवार, अॅड. परशुराम पवार हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. बाळाराम पाटील, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, विक्रांत पाटील, सुदाम पवार, विनायक कातकरी, वसंत पाटील, संतोष चिर्लेकर, पी. पी. खारपाटील, प्रियांका गोंधळी,नीता पवार, संतोष कातकरी, योगेश म्हात्रे, मनोज ठाकूर आदी उपस्थित राहणार आहेत.