पेणमध्ये मोटर रॅलीचे आयोजन

| पेण | प्रतिनिधी |
भारताच्या स्वातंत्र अमृत महोत्सव निमित्त सह्याद्री प्रतिष्ठान पेण व रोटरी क्लब ओरायन पेण यांच्या संयुक्तविद्यमाने तिरंगा मोटर सायकल प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी वाचनालय येथुन प्रभातफेरीला सुरुवात झाली. खोपोली रोड, चावडीनाका, गणपती वाडी बायपास रोड मार्गे तरणखोप, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने जुना पेट्रोलपंपमार्गे रायगड बाजार, कोतवाल चौकातून पुन्हा महात्मा गांधी मंदिर येथे या प्रभातफेरीची सांगता करण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये मफभारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जयअशा घोषणा देण्यात आल्या. ही प्रभात फेरी सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे समीर म्हात्रे,डॉ. सोनाली वनगे, सचिन शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. यावेळी अरविंद वनगे, अ‍ॅड. मंगेश नेने, स्वप्नील म्हात्रे, सुबोध जोशी, दिनेश पाटील,डॉ. मनिष वनगे, डॉ.संदीप चौधरी, महेश पाटील, अजित शिगवण, हरेश बेकावडे, दर्शन म्हात्रे, संतोष विठोबा पाटील तरणखोप, शशी भगत, स्वप्नील म्हात्रे, अमित पाटील, पराग कणेकर, महेंद्र मोहिते, स्वाती मोहिते, अदींसह सेवा निवृत्त भारतीय सैनिक, रोटरी क्लबचे सभासद तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे, यांच्या सह शेकडो पेणकर सहभागी झाले होते.

Exit mobile version