रोह्यामध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहा येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रोहे तालुक्यातील कोएसो मेंहेंदळे हायस्कुल, द.ग.तटकरे माध्यमिक विद्यालय कोलाड, गु.रा.अग्रवाल हायस्कुल नागोठणे व न्यू इंग्लिश स्कूल चणेरा या चार केंद्रावर इ.5 वी ते 7 वी व इ.8 वी ते 10 वी या गटातील विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बालकामगार प्रतिबंध, बेटी बचाओ-बेटी पढाओ, बालकांचे अधिकार, स्त्री भ्रूण हत्या व पर्यावरण संरक्षण आदी विषय ठेवण्यात आले आहेत. तर प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट तीन चित्रांना पारितोषिके व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

Exit mobile version