| खारेपाट | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे नारळी पौर्णिमेच्या दिवशी 30 ऑगस्ट 2023 रोजी सालाबादप्रमाणे या वर्षीही टाकादेवी स्पोर्ट क्लब व ग्रामस्थ मंडळ मांडवा यांच्या सौजन्याने दुपारी 2.30 वाजता राज्यस्तरीय कुस्त्यांचे जंगी सामने मांडवा बंदर येथे आयोजित करण्यात आलेले आहेत. सदर स्पर्धेत तालुका, जिल्हा व इतर राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील नामांकित पेहेलवान व आखाडे उपस्थित राहणार आहेत. सदर स्पर्धेत रोख रक्कम व आकर्षक बक्षिसे देण्यात येतात. तसेच सदर स्पर्धा पाहण्यासाठी सुमारे वीस ते पंचवीस हजार कुस्ती शौकीन उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत गुणानुसार एक ते तीन आराखडयास चषक देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेचे उद्धाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विधानसभाध्य राहूल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खा.सुनिल तटकरे, आमदार सर्वश्री जयंत पाटील, आशिष शेलार, बाळाराम पाटील माजी आ.पंडित पाटील, ॲड. आस्वाद पाटील, रणजित राणे, अभिजित राणे, अमित नाईक, राजू सांळुके, शंकरराव म्हात्रे, जयश्री म्हात्रे, राजाभाऊ ठाकूर, प्रविण ठाकूर तसेच जिल्हा व तालुक्यातील विविध स्तरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे. तरी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील क्रिडा रसिकांनी सदर स्पर्धेचा लाभ घ्यावा असे मत मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
टाकादेवी स्पोर्ट क्लब व ग्रामस्थ मंडळ मांडवा येथे पारंपारिक किनारा कुस्ती स्पर्धेसाठी व्यासपीठ लोकार्पण व कृतज्ञता सोहळा याचवेळी मांडवा बंदर येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.