‘एक दिवा शहिदांना’ कार्यक्रमाचे आयोजन

| सुकेळी | वार्ताहर |

सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या संकल्प मित्र मंडळ वांगणी यांच्या वतीने एक दिवा शहिदांना या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतांना प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना यावेळी वंदन करण्यात आले.

तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून गडकिल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला जनहित कामगार कर्मचारी महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य एकनाथ ठाकुर, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर ठाकुर, मोरेश्वर तेलंगे, हरिश्चंद्र तेलंगे, रविंद्र ठाकुर, भाऊ तेलंगे, सुरेश तेलंगे, पोलिस पाटील आदिती ठाकुर यांच्यासह आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version