पेणमध्ये महाकर्ज मेळाव्याचे आयोजन

। अलिबाग । वार्ताहर ।
वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार आणि जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया रायगडतर्फे गुरुवारी (दि.14) गांधी वाचनालय, पेण येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पेण शहर परिसरातील सर्व सरकारी, खाजगी अणि सहकारी बँका यामध्ये सहभागी होणार आहेत. या कर्ज मेळाव्यामध्ये छोट्या व्यवसायिकांना मुद्रा योजनेअंतर्गत शिशू कर्ज, हातगाडी वाले, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे यांच्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत कर्ज तसेच गृह कर्ज, वाहन कर्ज आणि शेतकर्‍यांना, मत्स्य व्यवसाय करणार्‍यांना, अणि कुकुट पालन आणि दूध व्यवसाय करणार्‍यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज, अलिबाग नगर पालिका भागातील बचतगटांना समुदाय कर्ज आदींचे योजनेंतर्गत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.या मेळाव्याच्या निमित्ताने अलिबाग मधील सर्व बँका एकाच छताखाली एकत्र येणार आहेत.

Exit mobile version