खेळाडूंनी तयारीला लागावे ; महादेव घरत
। उरण । वार्ताहर ।
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम, सामाजिक कार्य सुरु असतात. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी वर्षाच्या अखेरिस जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. याही वर्षी दि 19 ते 25 डिसेंबर दरम्यान चारफाटा बोकडविरा, ता. उरण येथे रायगड जिल्हास्तरीय 21 व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे सर्व खेळाडूंनी आता पासूनच तयारीला लागावे असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या बैठकीदरम्यान महादेव घरत यांनी उरण येथे केले आहे.
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांची महत्वाची बैठक द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी क्रीडा प्रमुख भरत म्हात्रे, आर्चरी स्पर्धाचे प्रमुख मुकेश गुरदाळे, नृत्य विभागाचे प्रमुख मुकेश घरत, काव्य व गायन स्पर्धाचे प्रमुख अरुण म्हात्रे, पी.सी.म्हात्रे, संदेश म्हात्रे, मणिराम पाटील, अरुण पाटील, किरण घरत, सुनीत घरत, किशोर घरत,आकाश पाटील व इतर प्रतिनिधी, पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत रायगड जिल्हा स्तरीय आयोजित केलेल्या स्पर्धेची तयारी व संबंधित विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
रायगड जिल्ह्यात होणार्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत महिला व पुरुष, शालेय विद्यार्थी, तरुण युवा, ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आले आहेत. यामध्ये रांगोळी स्पर्धा, सॅलेड स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, संगीत खुर्ची, अंताक्षरी, शाब्बास सुनबाई, झटपट खेळ, ज्येष्ठ स्पर्धा, फॅशन शो, महिला कबड्डी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, अंडरआर्म क्रिकेट, कविता वाचन, चित्रकला स्पर्धा, वेललिफ्टिंग, बुद्धिबळ, पॉवर लिफ्टिंग, कराटे स्पर्धा, स्लो सायकलिंग, खोखो, द्रोणागिरी श्री(शरीर सौष्ठव) स्पर्धा, द्रोणागिरी आयडीएल आदि विविध 132 स्पर्धांचा यात समावेश असून यावेळी रक्तदान, विज्ञान प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे स्पर्धा प्रमुख मुकेश घरत 7045028779, अरुण म्हात्रे 9987992519, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे 9619961184, क्रीडा प्रमुख भरत म्हात्रे 9619596456, सुनीत घरत 9819767459, सचिन पाटील 9768485050 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे.