योग महोत्सवाचे आयोजन

| रसायनी | वार्ताहर |

श्री रामचंद्र मिशनच्या हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचा वेलनेस फेस्ट योग महोत्सव कार्यक्रम आजादीचा अमृत महोत्सवनिमित्त दि. 29 एप्रिल ते 1 मे अशा तीन दिवसीय वाशी, नवी मुंबई येथील सिडको एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे मोफत होणार आहे. हा कार्यक्रम श्री रामचंद्र मिशनच्या हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटने भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ध्यान, तणाव पातळी कमी करणे, विश्रांती आणि कायाकल्प तंत्र, मेंदूचे व्यायाम, आहार आणि पोषण, प्राणायाम आणि बरेच काही यावर लक्ष केंद्रित करणारे अनेक कार्यक्रम असतील.

Exit mobile version