उस्मानाबाद । वार्ताहर ।
कोकण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्या, महापूर आला, आर्थिक हाणी बरोबरच जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली, अनेक गावे कुटुंबे बेचिराख, उद्ध्वस्त झाली अशावेळी अस्मानी संकटग्रस्त कोकण वासीयांना सावरण्यासाठी उस्मानाबादकरांनीही एक हात मदतीचा पुढे करत दीडशे कुटुंबाला जीवनावश्यक किराणा माल,कपडे व भांड्यांच्या वस्तू जागेवर जाऊन पोहोच केल्या.
यासाठी शेकापचे जिल्हा चिटणीस भाई धनंजय पाटील यांच्या संकल्प व पुढाकारातून राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ, उस्मानाबाद संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, शेतकरी कामगार पक्ष शाखा – उस्मानाबाद व भाई उद्धवराव पाटील विचार मंच उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ही मदत रायगड जिल्ह्यातील व महाड तालुक्यातील पूरग्रस्त पाडे, दुर्गम भागातील वस्त्यां, झोपड्या,बाळंद, कोंडीवते, राजेवाडी फाटा परिसरात जागेवर जाऊन पोच करण्यात आली.
शेकापचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील, रायगड जिल्ह्यातील आमदार भाई बाळाराम पाटील, मीनाक्षी पाटील, महाड तालुका चिटणीस भाई गणेश सावंत, सरपंच ज्योती पवार देवाभाई पाटील शेकाप पुरोगामी युवक चिटणीस,संतोष झांजे, कल्पेश मोरे, सतीश मोरे, बापू दळवी, नथुराम धामणे, अर्जुन जाधव, बाळू मोरे, सोपान दळवी, शशिकांत मोरे, बंटी झांजे आदी रायगड जिल्ह्यातील शेकाप नेते व कार्यकर्त्यांनी गरजू पूरग्रस्तांना मदत पोहोचण्यासाठी उस्मानाबादच्या टीमला साहाय्य केले. तर सर्वांचे प्रतिनिधी म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात उस्मानाबाद येथील भाई उध्दवराव पाटील विचार मंचचे कार्यकर्ते हनुमंत शेंडगे, बालाजी कोळी, व्यंकटेश पाटील, सचिन चौरे, राहुल गायकवाड यांनी ही मदत प्रत्यक्ष रायगड जिल्ह्यात जाऊन पोहोच करण्यास सहाय्य केले.