| पाली/बेणसे | प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (दि.28) संपूर्ण राज्यात घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. परिणामी परीक्षार्थी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व नाराजी आहे. भिवंडी येथे परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या 24 तास आधी प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय आल्याने आणि पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने परीक्षा परिषदेने हा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास भिवंडी पोलिसांना काही जणांकडे आगामी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील माहिती असल्याचे कळले. त्यानंतर तात्काळ संबंधित ठिकाणी धाड टाकली आणि हाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून पडताळणी केली असता, संशयितांकडे सापडलेले प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. या गंभीर प्रकारानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
TET Exam: टीईटी परीक्षार्थींमध्ये तीव्र संताप
