पी.पी.खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे स्नेहसंमेलन


| चिरनेर | प्रतिनिधी |

चिरनेर येथील पी.पी.खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलनाचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी 28 डिसेंबर रोजी पार पडले. याप्रसंगी शिक्षणा एवढेच आपल्या सुप्त गुणांना महत्त्व द्या या सुप्तगुणातच मुलांचे करिअर दडलेले असते असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त तथा सिडकोचे मुख्यदक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, पी. पी. खारपाटील, एकनाथ पाटील, के. एन. शेट्टी, राजेंद्र खारपाटील, समीर खारपाटील, सागर खारपाटील, परीक्षित ठाकूर, संजय पाटील, परशुराम पाटील, संजय भुजबळ, सुनिता खारपाटील, वनिता गोंधळी, दत्तात्रेय म्हात्रे, सुरदास राऊत, व्ही. ए. पाटील, सुप्रिया म्हात्रे, मंदा घरत, प्रकाश म्हात्रे, स्मिता मसुरकर, आनंद चिर्लेकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक पी. पी. खारपाटील, राजेंद्र खारपाटील, समीर खारपाटील, सागर खारपाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. मुख्याध्यापक सुरदास राऊत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले. आभार कार्याध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version