पाचकळशी समाज वधु-वर मेळावा

| अलिबाग | प्रतिनिधी |

एस.के.पी. शुभमंगल आणि पाठारे क्षत्रिय अष्टगर समाज, झिराड यांच्या संयुक्त विद्यमाने तपस्वी रामजी लक्ष्मण घरत समाज मंदिर सभागृहात 24 डिसेंबर रोजी पाचकळशी समाजातील इच्छुक वधु-वर यांच्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास विवाहोत्सुक 79 तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता.

या वधु-वर मेळाव्याकरिता ठाणे, मुंबई, उरण, नाशिक, चौल व अलिबाग परिसरातील तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. या मेळाव्यात 54 तरुण आणि 25 तरुणींनी सहभाग घेतला. हा वधु-वर मेळावा यशस्वी होण्यासाठी एस.के.पी. शुभमंगलचे ग्रुप अडमिन प्रशांत राज, निलेश म्हात्रे, स्मिता घरत, प्रगती म्हात्रे तसेच पाठारे क्षत्रिय अष्टागर समाजाचे अध्यक्ष सुबोध राऊत, सचिव मोहन पाटील, खजिनदार विकास पाटील, सहसचिव गणेश पुरो, नवीनचंद्र राऊत, विलास नाईक, अरुण राऊत, योगेश ठाकूर, अच्युत म्हात्रे, सतीश सुतार, कल्पना म्हात्रे, प्रभाकर घरत, विनय घरत, विपीन राऊत यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version