सत्यनारायण देवाचा पालखी सोहळा

। माणगाव । प्रतिनिधी ।

ओम आदिनाथ मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण देवाचा महोत्सव शुक्रवारी (दि.19) पेणतर्फे तळे येथे संपन्न झाला. या पारायणाचे नेतृत्व गुरुवर्य विठोबा मांडलूस्कर, शिवाजी जाधव व नारायण पतारे यांनी केले. यानिमित्ताने बुधवारी (दि.17)राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. गुरुवारी (दि.18) ज्ञानेश्‍वरीतील नवव्या व बाराव्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. शुक्रवारी पुष्पवृष्टी व दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. चक्री प्रवचन, समुदायिक भजन, कीर्तन, हरिपाठ इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थ, महिला मंडळ व नामधारक मंडळी यांच्या सहकार्यातून महोत्सव अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

Exit mobile version